कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग,डोंबिवली समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांकरिता विविध शिष्यवृत्ती योजना राबविते. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी जे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छितात किंवा ज्यांनी त्यात प्रवेश घेतला आहे, त्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती साठी अर्ज मागवत आहे.
१) श्री दिपक शांताराम आणि सौ. सरिता दिपक देसाई विद्यार्थी सहाय्यता योजना - हि योजना श्री दिपक शांताराम देसाई, पुणे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सरिता देसाई यांनी संस्थेस दिलेल्या देणगीतून येणाऱ्या उत्पन्नातून चालवण्यात येते.या योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व शालेय आणि महाविद्यालयीन गरजू आणि होतकरू विद्यार्थी पात्र आहेत.
२) शिवराम वासुदेव आणि विजया शिवराम तेंडोलकर शैक्षणिक फंड- ही शिष्यवृत्ती योजना माननीय शिवराम वासुदेव तेंडोलकर,मूळ गाव- झाराप यांनी सहयोगला दिलेल्या उदार देणगीतून चालवण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेसाठी कोकणातील कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीतील महाविद्यालयीन विद्यार्थी पात्र आहेत.
३) सहयोग शिष्यवृत्ती योजना- ही योजना डोंबिवलीच्या रहिवासी असणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता आहे.
१) शिष्यवृत्ती विद्यार्थ्यास प्रदान करण्यासंबंधी संस्थेच्या कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असेल.
२)प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख शालेय विद्यार्थ्यांकरिता ३० जून २०२६ असेल तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता २५ जुलै २०२६ असेल.
३) सदर शिष्यवृत्ती फाॅर्म संपूर्ण भरून Pdf फाईल डाऊनलोड करुन 9920702375 या क्रमांकावर व्हाट्सअप करावी.
४ ) शिष्यवृत्ती ही शक्यतो शाळेच्या / महाविद्यालयाच्या/ वसतिगृह यांच्या नावाने धनादेशाद्वारे दिली जाईल.
खालील क्रमांकावर संपर्क केल्यास संस्थेचे कार्यकर्ते योजनेची अधिक माहिती देतील.
अधिक माहितीसाठी संपर्क-
सौ. दिपाली वालावलकर 9673172633
सहयोग कार्यालय 9920702375
जास्तीत जास्त गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी ही नम्र विनंती.
धन्यवाद